आंदोलन पुन्हा उभे करू,
कृषि पंपधारकांचा सरकारला इशारा....
आंदोलनाची वेळ ११ वा. पासून रात्री ९ वाजेपर्यंत
भारनियमन बंद झालाच पाहिजे म्हणून कृषिपंपधारकांनी अगदी शांतपणे प्राथमिक आरोग्य केंद्र भेंडाळा येथून पाईपाई जवळपास दिड किलोमीटरचा अंतर कापत अगदी शांतपणे पोलिस बंदोबस्तात महावितरण कार्यालया पर्यंत आपल्या घोषणा देत शांतपणे महावितरण कार्यालय गाठले. तिथं आपल्या मागण्याचे निवेदन शाखा अभियंता यांच्या कडे सुपूर्द केला,जो पर्यंत शेतकाऱ्याच्या मागण्याचा मार्ग सुटत नाही तोपर्यंत इथच ठिय्या आंदोलन करू असा पवित्रा घेत ठिय्या आंदोलन सुरूच होता आणि आंदोलन सकाळी ११ वाजता पासून ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरूच होता.
नायब तहसीलदार यांच्या मध्यस्तिने आंदोलन मागे
भारनियमन बंद झालाच पाहिजे ही मागणी घेऊन भेंडाळा सब स्टेशन अंतर्गत गावांतील कृषिपंप धारकांनी जे आंदोलन उभे केले होते ते आंदोलन जवळपास ११ तास सुरूच होता,जो पर्यंत आपली मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशा पवित्र्यात शेतकरी असतांना चामोर्शी तालुक्याचे तहसीलदार यांनी दखल घेत रात्री ९ वाजता आपला प्रतिनिधि म्हणून,तालुक्याचे नायाब तहसीलदार यांनी मध्यस्थी करून शेतकाऱ्यांसोबत चर्चा करून आंदोलन मागे घेण्याबाबत विनंती केली आणि आंदोलन मागे घेण्यात आल. आंदोलन कशा पद्धतीने मागे घेण्यात आलं ते समोर समजाऊन सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहे.
तहसीलदार आणि महावितरण अध्यक्ष यांच्या सोबत बैठक
भारनियमन बंद झालाच पाहिजे या मागणीकरीत ज्या शेतकऱ्यांनी आंदोलन करून शासनापर्यंत आपल्यावर होत असलेल्या अन्यायाच्या विरुद्ध जवळपास ११ तास आंदोलन सुरूच ठेवण्यात आले,प्रशासन जोपर्यंत आम्हच्या मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा देत सरकारवर दडपण आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला,संपूर्ण भारनियमन बंद होत नसेल टर निदान १२ तास तरी कृषिपंप धारकांना वीज मिळावी अशी अपेक्षा व्यकत केली,त्यावर नायाब तहसीलदार यांनी मध्यस्थी केली ती अशी,दि.२९/१०/२०२३ रोजी सोमवारला महावितरण कार्यालयात स्वता तहसीलदार आणि महावितरणचे अध्यक्ष अभियंता यांनी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधि सोबत चर्चा करण्याचे आश्वासन दिले आणि अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून नंतर आपला विचार करू असा निर्धार व्यक्त करीत कृषिपंप धारकांना आपला ११ तासांचा आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेत आंदोलन स्थगित केलं.
भारनियमन बंद झाला पाहिजे याकरिता कुणाला निवेदन दिले
- भारनियमन बंद झालाच पाहिजे ही मागणी घेऊन कृषिपंप धारकांनी दि.१३/१०/२०२३ रोजी भेंडाळा सबस्टेशन अभियंता मा. तिरसुडे साहेब यांच्या कडे जवळपास २०० ते २५० कृषिपंप धारकांनी निवेदन दिले.
- दि.१३/१०/२०२३ रोजी चामोर्शीचे तहसीलदार यांच्या कडे २०० ते २५० कृषिपंप धारकांनी निवेदन सादर केले.
- दि.१६/१०/२०२३ रोजी गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. संजय मिना यांना निवेदन सादर करायला गेले असता ते हजर नसल्यामुळे उपजिल्हाधिकारी मा. पाटील साहेब यांच्या कडे निवेदन सादर केले.
- दि.१६/१०/२०२३ रोजी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ऊर्जा मंत्री मा. देवेंद्रजि फडणवीस यांच्या कडे निवेदन सादर केले आणि कृषिपंप धारकांच्या मागण्या मंजूर करण्याकरिता तीन दिवसांचा कालावधी देण्यात आला.
मागण्या मंजूर न झाल्यामुळे आंदोलन उभे झाले
भारनियमन बंद झालाच पाहिजे ही मागणी घेऊन कृषिपंप धारकांनी प्रशासनाला तीन दिवसांची मुदत देत निवेदन सादर केले. परंतु काहीच निर्णय प्रशासन घेऊ न शकला त्यामुळे कृषिपंप धारकांनी दि.२०/१०/२०२३ रोजी भेंडाळा सबस्टेशन वर मोर्चा घेऊन तब्बल ११ तास शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या करिता ठिय्या आंदोलन चालूच ठेवून शासनाचा लक्ष वेधला नंतर तालुक्याचे नायाब तहसीलदार यांच्या मध्यस्थीने त्या दिवसाचा आंदोलन मागे घेत प्रशासनाने यश मिळवलं असं म्हणायला काहीच हरकत नाही.
भारनियमन विरोधात उभे केलेला आंदोलन तात्पुरतस स्थगिती करण्यात प्रशासनाला यश आलेला असेल तरी कृषिपंप धारकांच्या मागण्यांची प्रशासनानं काहीच दखल घेतली नाही तर सोमवार नंतर अधिक तीव्र स्वरूपात आंदोलन करू असा कृषिपंप धारकांनी पवित्रा घेत आपला आक्रोश प्रकट करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि आपल्या अन्याया विरुद्ध आवाज उठविण्याबाबत कृषिपंप धारकांना कुणीही रोखू शकत नाही.
आणखी वाचा: कृषि पंपधारकांचा एल्गार तीन दिवसांचा .
भारनियमन बंद करा नाहीतर वीज कनेक्शन कापा
भारनियमन बंद झालाच पाहिजे अशी मागणी घेऊन कृषिपंप धारकांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे आणि त्याचं कारण ही तसंच आहे ज्या भागात भारनियमन सुरू आहे त्या भागात पीक आहे आणि त्या भातपिकाला किती पाणी लागतो हे प्रत्येकाला माहीतच आहे,आता भातपिक फुलोऱ्यावर आलेला असून पाण्याचा शेवटचा टप्पा शेतकऱ्यांना सुरळीत मिळावा हिच अपेक्षा शेतकऱ्यांची आहे आणि शेतीला पंप असून जर पीक मरत असेल तर कृषिपंपांचा उपयोग काय ? हा मूळ प्रश्न शेतकऱ्यांचा आहे. कृषिपंप असून शेती मरत असेल तर महावितरण शेतीची नुकसान भरपाई दयावी नाहीतर शेतकऱ्यांच्या शेतात असलेले वीज कनेक्शन कापावे आणि तेही खांबा सहित उपटून घ्यावे हिच मागणी घेऊन शेतकरी पुन्हा आंदोलन उभा करू असा इशारा दिला आहे.
0 टिप्पण्या