जन आंदोलन शिवाय पर्याय नाही,
कृषिपंप धारकांना रमेश चौखूंडेचे आव्हान !
गडचिरोली जिल्ह्यातील भेंडाळा सबस्टेशन अंतर्गत घरगांव व कळमगांव असे दोन फिटर असून,मागील एक वर्षापासून भारणीयमनाच्या विळख्यात सापडला असून कृषिपंप धारकांना भात शेती,पाण्याविना मरण यातना भोगत असतांना शेतकऱ्यांचा वाली आता कोणीच उरला नाही,अशी सध्याच्या परस्थितीवरून लक्षात येते,त्याकरिता आता पुन्हा एकदा जनआंदोलन उभे केल्या शिवाय कृषिपंप धारकांकडे काहीच पर्याय उरलेला नाही.
- महावितरण अधिकारी आणि शिष्ट मंडळाची बैठक
दि.२०/१०/२०२३ रोजी भेंडाळा येथील महावितरण कार्यालयांवर आंदोलन करून कृषिपंप धारकांनी आपल्या हक्काची मागणी मागून घेण्याचा प्रयत्न केला,नंतर महावितरण अधिकारी आणि तहसीलदार chamorshi यांच्या प्रयत्नाला यश आला आणि २३/१०/२०२३ रोजी आपण चर्चा करू म्हणून,आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले,आता अधिकारी चर्चेला तयार आहेत म्हणून कृषिपंपधारक काहीतरी निर्णय निघेल या हेतूने तयारी दर्शवली,सोमवारी महावितरण कार्यालय चमोरशी येथे बैठकीचे आयोजन करून चर्चेला सुरुवात झाली,परंतु २४ तास तर नाहीच परंतु १२ तास वीज दयायला महावितरणचे अधिकारी असमर्थता दर्शवली.
- वीज देत नसाल तर कनेक्शन कापा-शिष्टमंडळ
भातपीक शेवटच्या टप्यात असून याच कालावधीत भातपिकाला जास्त पाणी पाहिजे म्हणून कृषिपंप धारकांच्या शिष्टमंडळाने महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे विनंती केली परंतु ते आम्हच्या हातात नाही,तो महाराष्ट्र सरकारच्या अकत्यारीत असल्याची कबुली दिली,तेव्हा शिष्टमंडळाने नाईलाज म्हणून २४ तास वीज देत नसाल तर आम्हचे वीज कनेक्शन कापा,अशी धमकी दिली असता महावितरण अधिकारी त्यालाही विरोध दर्शवीत महाराष्ट्र सरकारकडे बोट दाखवून मोकळे झाले,म्हणजे सध्यातरी महावितरण अधिकारी आपले हात वरती करून सरकारकडे बोट दाखवीत असल्याचा प्रकार सुरू आहे.
- गडचिरोली येथे वनमंत्री मूनगंटीवार यांना निवेदन
कृषिपंप धारकांवर आलेला भारणीयमनाच भूत खाली उतरण्याच्या त्यारीत नसल्या कारणाने राज्याचे वनमंत्री तथा सांस्कृतिक मंत्री मा. मूनगंटीवार गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याचे लक्षात येताच शिष्टमंडळाने गडचिरोली गाठले आणि मूनगंटीवार यांना निवेदन देऊन,कृषिपंप धारकांवर होत असलेल्या अन्यायाचा पाडा वाचला,त्यावर मूनगंटीवार २४ तास नाही परंतु १२ तास कृषिपंपांना वीज पुरवठा मिळण्याबाबत सतर्कता दर्शवली परंतु शिष्टमंडळ २४ तासांवर अडून बसले असता,मंत्री महोदयाने २४ तासाला असमर्थता दर्शवून निघून गेले,आता उदयाला म्हणजे २४ तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री यांना निवेदन देऊन कृषिपंप धारकाच्या व्यथा उपमुख्यमंत्र्यान समोर मांडणार आहे.
- निवेदन देण्याचा उदया शेवटचा दिवस
कृषिपंप धारकांना २४ तास वीजपुरवठा मिळावा यामागणी करिता,
- सर्वप्रथम सबस्टेशन अभियंता यांना १३/१०/२०२३ ला लेखी निवेदन दिले,त्याच दिवशी मा. तहसीलदार आणि महावितरण कार्यालय chamorshi येथे निवेदन देण्यात आले.
- त्यानंतर गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना आणि राज्याचे ऊर्जामंत्री व पालकमंत्री यांना १६/१०/२०२३ रोजी निवेदन देण्यात आले.
आणि उदयाला २४/१०/२०२३ रोजी नागपूर येथे जाऊन मा. ऊर्जामंत्री यांना समक्ष भेटून निवेदन देणार आहेत,आणि आत्ता यासमोर निवेदनाची प्रक्रिया संपली अशी कृषिपंप धारकाचे शिष्टमंडळ सांगून मोकळे झाले आहे.
- आता फक्त जनआंदोलन
२४ तास वीज मिळावी ही मागणी घेऊन कृषिपंप धारकांनी २०/१०/२०२३ रोजी महावितरण कार्यालयावर आंदोलन करून आपल्या मागण्या मागीतल्या आणि आता लेखी निवेदन देवून जर शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास सरकार हिरावण्याचा प्रयत्न करीत असेल तर कृषिपंप धारकांना पुन्हा एखदा जनआंदोलन उभे केल्याशिवाय काहीच पर्याय उरलेला नसेल अशीच परीस्थिति कृषिपंप धारकांवर आलेली आहे.
तोंडात आलेला घास जर सरकार हिरावण्याचं प्रयत्न करीत असेल तर शेतकऱ्यांना जनआंदोलन करून आपल्या हक्काची मागणी मागावी लागेल.
- जगाचा पोशिंदा बळीराजा,हक्कासाठी रस्त्यावर उतरतोय..
भारत हा कृषिप्रधान देश आहे,जगाला फक्त जगाचा पोशिंदा म्हणजे बळिराजाच जगवू शकतो अस म्हणणाऱ्या बळिराजाला आपली मागणी पदरात पडून घेण्याकरिता रस्त्यावरची लढाई लढायची वेळ येत असेल तर बळिराज्याचे सर्वात मोठे दुर्दैव आहे,असच म्हणावं लागेल. शेतकाऱ्यांप्रती असलेली राज्यकर्त्यांची कळवळ हा नुसता देखावा असून राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना भरडण्याचा प्रयत्न करीत आहे,असच यातून संदेश दयायचा आहे,असं म्हणायला काहीच हरकत नाही,परंतु राज्यातील राज्यकर्त्यांनो हे लक्षात ठेवा,शेतकरी कमजोर नाही,दुबळा नाही आणि लाचारही नाही,आपल्या हक्काची मागणी मागण्याकरीत रस्त्यावर उतरेल आणि आपल्या हक्काची मागणी पदरात पाडून घेईल आणि बळीराजा काय आहे ? हे सुद्धा राज्यातील राज्यकर्त्यांना दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र नक्की.
0 टिप्पण्या