Ad Code

Responsive Advertisement

चामोर्शी तालुका दुष्काळ ग्रस्त घोषित करा, निवेदनाद्वारे मुख्यमंत्री शिंदेंना रमेश चौखुंडेंची विनंती

 

चामोर्शी तालुका दुष्काळ ग्रस्त घोषित करा, निवेदनाद्वारे मुख्यमंत्री शिंदेंना रमेश चौखुंडेंची विनंती 

निसर्गाच्या लहरिपणामुळे पाऊस वेळेवर पडत नाही आणि शेती व्यवसाय हा निसर्गावर अवलंबून असल्यामुळे शेतकऱ्यांवर बरेचदा दुबार,तीबार पेरणीचे संकट ओढवतात आणि आता मागील दोन महिन्यापासून पाऊस नसल्यामुळे धानपिक तसेच कापूस पीक शेतकऱ्यांच्या हातातून आजच्या घडीला गेलेला आहे तरी चामोर्शी तालुका दुष्काळ ग्रस्त घोषित करून शेतीपासून झालेली नुकसान शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी मागणी करून राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदें आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना तहसीलदार चामोर्शी यांच्या मार्फत निवेदना द्वारे कळविण्यात आलेला आहे. 

दुष्काळ


  • ४० तालुके दुष्काळ ग्रस्त घोषित,तर चामोर्शी तालुका दुष्काळ ग्रस्त घोषित करा. 

महाराष्ट्र सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील चाळीस तालुके दुष्काळ घोषित करा,कारण चामोर्शी तालुक्यात भातशेती आणि कापूस अशी दोन्ही प्रकारची पीक घेतल्या जाते आणि निसर्गाच्या लहरिपणामुळे पाऊस वेळेवर पडत नाही,म्हणून शेतकऱ्याची अतोनात नुकसान होते,त्यामुळे सरकारने या आधी ४० तालुके दुष्काळ ग्रस्त घोषित केलेले आहे. त्याबरोबर माझा चामोर्शी तालुका देखील दुष्काळ ग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी,जेणे करून शेतकऱ्यांनी लावलेली लागत तरी परत मिळाल्या सारखे होईल आणि चामोर्शी तालुक्यातील शेतकरी सुखी समाधानाने संसाराची विस्कळीत झालेली घडी योग्य रीतीने बसवेल,अशी मी चामोर्शी तालुक्याच्या वतीने शासनाला विनंती करतो. 

दुष्काळ


  • चामोर्शी तालुक्यात कोणताही रोजगार नाही 

चामोर्शी तालुक्यात शेतीशिवाय कोणातही रोजगरांचा माध्यम नसून तालुक्यातील बहुतांश लोक शेतीला प्राधान्य देत शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय मानलेला आहे आणि निसर्गाच्या लहरिपणामुळे पाऊस वेळोवेळी पडत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून. पिककर्ज आणि इतर घेतलेले कर्ज कश्या रीतीने परत करायचे हा सर्वात मोठा संकट आज शेतकऱ्यांसमोर आवासून उभा आहे आणि चामोर्शी तालुका रोजगार हीन असून या तालुक्यात कोणतीही रोजगाराची सोय आजच्या घडीला तरी उपलब्ध नाही. 

दुष्काळ


महाराष्ट्र सरकारने चामोर्शी तालुका दुष्काळ ग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी आणि शेतकऱ्यांना शेतीला जोडधंदा म्हणून शेती निगडीत छोटे-छोटे रोजगार उपलब्ध करण्यास सरकारने मदत करावी,जेणे करून चामोर्शी तालुक्यातील शेतकरी शेतीसोबत शेती निगडीत व्यवसाय उभारून आपल्या संसाराची विस्कुटलेली घडी सुधारू शकेल किंवा शेतकऱ्यांना दूसरा रोजगार शोधण्यासाठी इतरत्र वनवन भटकण्याची वेळ येणार नाही. छोटे-छोटे शेती निगडीत व्यवसाय सांभाळून देशाच्या आर्थिक क्षेत्रात शेतकरी या नात्याने महत्वाचा भागीदार होईल कारण भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांचा उत्पन्न दुप्पट करण्याचा त्यारीत असून त्यामध्ये चामोर्शी तालुक्याचा समावेश करावा जेणे करून शेतकरी सुजलाम-सुफलाम होईल आणि आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी मुक्त होईल. माझी शेतकरी या नात्याने केंद्र सरकारला विनंती आहे,कोणतेही किचकट निकष न लावता शेतकऱ्यांना शेतीसाठी व शेती निगडीत व्यवसायासाठी भरीव निधी उपलब्ध करून दयाव,म्हणजे शेतकरी शेती सोबतच जोडधंदा उभारून सुखी समाधानाने जीवन करेल. 

आणखी वाचा :शिक्षण खाजगीकरणात मनुवादी प्रवृत्ती बोकाळतोय,बहुजनानो सावध व्हा..

  • २४ तास वीज नाही आणि नहराचा पाणी ही नाही 

चामोर्शी तालुक्यात असे कितीतरी गावे आहेत की,त्यांच्या शेतीचे अतोनात नुकसान झालेले आहे,म्हणजे पीक नष्ट झालेला आहेत,कारण चंद्रपूर जिल्हया लगतचे जि गावे आहेत त्यांना नहराचा पाणी अजिबात जात नाही आणि ज्या गावांना नहराचा पाणी जात नाही नेमकं त्याच गावांना भारनियमन सुरू आहे,म्हणजे २४ तास वीज पुरवठा मिळत नाही आणि धान पिकाला भरपूर पाण्याची आवश्यकता असून,शेतकरी आठ तासाच्या विजेमुळे हवालदिल झालेला असून शेतकऱ्याला धानपिक वाचविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे,तरी शेतकरी धान पिकाची शेती वाचविण्यात असमर्थ ठरलेला असून आर्थिक संकटाशी सामना करीत आहे,ही परीस्थिति चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. 

दुष्काळ


  • मायबाप सरकार शेतकऱ्यांना मदत करा 

चामोर्शी तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून पुढचे जीवन जगण्याचे संकट शेतकऱ्यांवर येवून ठेपली आहे आणि सर्व खर्च करून शेतकरी संपूर्ण नागडा झालेला आहे आणि तोंडाशी आलेला घास आता नष्ट होतांना शेतकाऱ्यांसमोर नवं संकट आवासून उभा आहे आणि संपूर्ण नागडा झालेला शेतकरी,महाराष्ट्र सरकारकडे चामोर्शी तालुका दुष्काळ ग्रस्त घोषित करून मायबाप सरकार शेतकऱ्यांना भरीव मदत करावी अशी विनवणी शेतकरी सरकार कडे करत आहे,कारण तोंडाशी आलेला घास हिरावल्या सारखा होत असेल तर त्या गोष्टीचे दुख तर होणारच आहे. कारण शेतकाऱ्यांसमोर अनेक संकटे उभी आहेत,जसं बँकेचे पिककर्ज,कृषि केंद्राची उधारी,मुलाबाळाचे लग्न व शिक्षण आणि आरोग्य अश्या कितीतरी समस्या शेतकाऱ्यांसमोर उभ्या आहेत,म्हणजे बिचारा शेतकरी किती आर्थिक अडचणीत गुरपटला असेल,म्हणून सरकारने शेतकऱ्यांच सारासार विचार करून चामोर्शी तालुका दुष्काळ ग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी हिच विनंती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या