Ad Code

Responsive Advertisement

वेगळा विदर्भ झालाच पाहिजे, ही मागणी अधिक जोमाने लढावी लागेल

           
वेगळा विदर्भ झालाच पाहिजे,            
ही मागणी अधिक जोमाने लढावी लागेल 


वेगळ्या विदर्भाची मागणी ही तशी जुणीच आहे परंतु शासनकर्त्यांच्या उदाशीन धोरणामुळे वेगळा विदर्भ झालाच पाहिजे,ही मागणी अधिक जोमाने रेटून धरावी लागेल,अशी आता आवश्यकता भासू लागली आहे.वेगळा विदर्भ करू अशी भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात सांगितले होते पण सत्ता हातात येताच सरड्या सारखे रंग बदलवून मोकळे झाले.शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मनाले होते विदर्भावरील अन्याय दूर नाही झाला तर मी स्वतः वेगळा विदर्भ आंदोलनाचे नेतृत्व करेल असा शब्द दिला होता बाळासाहेबांनी आता बाळासाहेब तर राहिले नाहीत परंतु बाळासाहेबांचा वारसा सांगणारे वर्तमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे विचार विसरले की काय ? असा प्रश्न उपस्थित होतो.

वेगळा विदर्भ


आजच्या घडीला 63 वर्षे झालेत वेगळ्या विदर्भाची मागणी चालू आहे,पण देशातील राज्यकर्त्यांनी वेगळा विदर्भ दिलाच नाही परंतु विदर्भावर सतत होणारा अन्याय देखील दूर केला नाही.वास्तविक वेगळा विदर्भ झालाच पाहिजे ही मागणी रास्त आहे,परंतु राज्यकर्त्यांच्या उदाशीन धोरणामुळे वेगळ्या विदर्भाची मागणी सतत मागे पडत गेली अन याला कारणीभूत फक्त राजकीय पुढारी आहेत.मग ते भाजपाचे असो किंवा काँग्रेस पक्षाचे असोत किंवा कोणी अन्य पक्षाचे असो.विदर्भ वेगळा झालाच पाहिजे ही विदर्भातील तमाम जनतेची मागणी आहे अन् या मागणीसाठी विदर्भीय जनता आसुसलेले आहे,असं असताना देखील राज्यकर्त्यांच्या उदाशीन धोरणामुळे विदर्भ वेगळा झालेला नाही.

वेगळा विदर्भ

वास्तविक राज्याचे हिवाळी अधिवेशन विदर्भात घेतल्या जाते परंतु विदर्भ विकासासाठीच्या मुद्द्यावर विदर्भातील किंवा राज्यातील एकही आमदार बोलताना दिसत नाही.सगळेच विदर्भाचे आमदार मुंग गिळून गप्प राहतात मग ते कोणत्याही पक्षाचे असोत राज्यातील सरकार नेहमीच विदर्भासोबत सावत्र वागणूक करीत आहेत,परंतु वेगळा विदर्भ होऊ नये असं खुद्द विदर्भातील आमदारांना वाटत असेल, असंच यावरून लक्षात येते.विदर्भातील जनता साधी भोळी जनता आहे गरीब जनता आहे आणि आज पर्यंत राज्यकर्त्यांवर विश्वास ठेवत आलेली आहे परंतु आता वेगळ्या विदर्भाची मागणी विदर्भातील जनतेला समजायला लागली आहे आणि ज्या दिवशी विदर्भाची जनता आपल्या मनावर बिंबवेल त्यादिवशी मात्र राज्यकर्त्यांची खैरात काढल्याशिवाय राहणार नाही,हे मात्र सत्य आहे.


आणखी वाचा : पालकमंत्री गेले कुणीकडे,जिल्ह्यातील जनता शोधात.....

शेतकरी नेते तथा देशोन्नतीचे संपादक मा. प्रकाशभाऊ पोहरे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विधानसभेच्या पत्रकार गॅलरीत बसून सरकारच्या कारभारावर बारीक लक्ष ठेवून होते. राज्यातील राज्यकर्ते आपाआपल्या पक्षाची बाजू मांडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत होते परंतु विदर्भाच्या मुद्द्यावर कोणीच बोलायला तयार नव्हते,परंतु विदर्भावर अन्याय होताना गप्पा बसणारे म्हणजे प्रकाश भाऊ कसे,त्यांनी भर अधिवेशनात पत्रकार गॅलरीतूनच वेगळ्या विदर्भाची घोषणा देत  विदर्भाचा आवाज बुलंद करीत होते,परंतु सरकारने वेगळाच अर्थ शोधून चालू अधिवेशनात घोषणा दिल्या,गोंधळ घातला अशा बातम्या झळकल्या.

वेगळा विदर्भ

वास्तविक प्रकाश भाऊ जो आवाज उठविला होता तो गोंधळ नव्हताच त्यांनी मूळ मूलभूत मुद्द्याला वाचा फोडण्याचे काम केले,विदर्भातील जनसामान्यांच्या प्रश्नांवर चर्चा न होता अन्न विषयांवर चर्चा मध्ये अधिवेशन भरकटले जाऊ शकते,याची जाणीव भाऊंना होती.प्रकाश भाऊ विदर्भाचे बुलंद आवाज आहेत हे साऱ्या विदर्भाला ठाऊक आहे आणि विदर्भातील जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. भाऊंनी अधिवेशनात विदर्भाचा आवाज बुलंद केला म्हणजे योग्य वेळी योग्य निर्णय घेतला विदर्भाच्या सुपुत्र विदर्भाचा ढाण्या वाघ मुंग गिळून चूप कसा काय बसेल.भाऊंनी योग्य वेळी योग्य निर्णय घेत चालू अधिवेशनात विदर्भ मागणीची डरकाळी फोडली,परंतु सरकारला जाग केव्हा येईल ? हे कुणालाच ठाऊक नाही. 

(वेगळा विदर्भ ह्या मुद्दयावर फडणवीस साहेबांचे वक्तव्य)




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या