Ad Code

Responsive Advertisement

जनाधार गमावलेले आमदार घेऊ पाहतोय गौतमीचा आधार



जनाधार गमावलेले आमदार घेऊ पाहतोय    गौतमीचा आधार

भारतीय जनता पक्षाचे आमदार मा. देवरावजी होळी आपल्या वाढदिवसाच्या निमित्याने चामोर्शी  शहरात राज्यातील गाजलेली नृत्यांगणा गौतमी पाटील यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्याचे आयोजन केले असून,तशी रितसर जिल्हाधिकारी यांच्या कडून परवानगी घेतली आहे. आमदार डॉ. देवराव होळी यांचे स्वीय सहाय्यक दिलीप मस्के यांनी ही माहिती दिली.




  • हिवाळी अधिवेशन आणि वाढदिवस

गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे भारतीय जनता पक्षाचे आमदार डॉ. होळी याच मतदार संघाचे दोन वेळा नेतृत्व करीत असून क्षेत्रातील मतदारांवर मनावं तसं आपलं वर्चस्व सिद्ध करू शकले नाही आणि निष्क्रिय आमदार अशी ओळख निर्माण करून आमदार साहेब बऱ्याचदा चर्चेत सुद्धा आहेत आणि दोनवेळा विधानसभेवर कोणत्या प्रकाराने नेतृत्व करीत आहे,हा न उलगडणारा कोडा आहे,हे मात्र नक्की आहे. आमदार साहेबांनी वाढदिवस मोठ्या थाटामाठात साजरा करावं,ही आमची सुद्धा ईच्छा आहे. तशा आमच्याकडून आमदार साहेबांना भरभरून शुभेच्छा देखील आहेत.



देवराव होळी

 

राज्याच्या उपनगरात म्हणजे नागपूरला राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि उदयोगहीन जिल्हा म्हणून जिल्ह्याची ओळख आहे आणि अशा परिस्थितीत खरं तर आमदार साहेब अधिवेशनात जिल्ह्याचे प्रश्न उपस्थितीत करून गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास या मुद्यावर भर द्यायला पाहिजे पण आमदार साहेबांची मनावं तशी मानसिकता दिसत नाही,हे यावरून सिद्ध होत आहे. वास्तविक आमदार साहेब चामोर्शी शहरात वास्तव्यास असल्यामुळे आणि चामोर्शी तालुक्यात सर्वात जास्त शेतकरी असून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडून अधिवेशनात जास्तीत जास्त मुद्यांवर भर देवून सरकार वर आपला दबदबा निर्माण करायला पाहिजे,अन शेतकऱ्यांचे प्रश्न योग्य रीतीने हाताळायला पाहिजे पण तसं होतांना दिसत नाही किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे मानस आमदार साहेबांच्या कृतीत नसणारा विषय असेल,असंही होवू शकतो.

आज जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोक शेतीवर आपली उपजीविका करतात अन ह्या गोष्टी आमदार साहेबांना नवख्या नाहीत. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आवासून उभे आहेत,जसा की भेंडाळा परिसरातील बऱ्याच गावांचा भारणीयमनाचा प्रश्न आहे,कारण शेतीवर मोटारपंप लावून सुद्धा विजे अभावी शेतकऱ्यांचे हातचे पीक नष्ट झालेली आहेत आणि अजूनही कृषिपंप धारकांचा भारणीयमनाचा निपटारा झालेला नाही. वास्तविक हा प्रश्न शेतकऱ्यांसाठी आणि स्वता आमदार साहेबांसाठी सुद्धा गंभीर विषय होता,आमदार साहेब मनावर घेतले असते तर हा प्रश्न मार्गी लावू शकले असते,परंतु कृषिपंप धारकांचा प्रश्न हाताळण्यात आमदार साहेब अपयशी झालेत म्हणजे कृषिपंप धारकांच्या नजरेत आमदार नापास झालेत आणि आजच्या घडीला तर कृषिपंप धारकांचा रोष आपल्या क्षेत्राचे आमदार म्हणून त्यांच्या वरचं व्यक्त करीत आहेत आणि याला जबाबदार फक्त आमदार होळी साहेबच आहेत.




ज्या पक्षाचे आमदार आहेत,त्याच पक्षाचे राज्यात सरकार आहे आणि अंदर साहेब रस्ता उकळून गेलाय म्हणून भेंडाळा येथे रस्त्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करून,आपली प्रतिमा जनसामान्यात दाखवून दिले. सांगायचे इतकेच आहे की,एक लोकप्रतिनिधी म्हणून कृषिपंप धारक शेतकऱ्यांसाठी आक्रमक पवित्रा घेऊन ऊर्जामंत्र्यांवर दबाव निर्माण करून भारणीयमनाचा प्रश्न मार्गी लावू शकले असते आणि कृषिपंप धारक शेतकऱ्यांची सहानभूती प्राप्त करू शकले असते पण आमदार साहेब ते नाही करू शकले.

आणखी वाचा : आमदार साहेब तुम्हचा मोर्चा तुम्हचे सरकार अन तुम्हचाच पर्चा....

चामोर्शी तालुक्यात एकमेव धरण आहे आणि तालुक्यातील शेतकरी कन्नमवार जलाश्याच्या भरोश्यावर शेती पिकविल्या जाते आणि भेंडाळा परिसरात ज्या गावांवर भारणीयमनाचा फटका आहे,नेमका त्याच गावांना नहराचा पाणी मिळत नाही. म्हणजे जिकडे-तिकडे मर्ण फक्त शेतकऱ्यांचाच आहे. इकडे शेतकरी पिकविणा मरत आहे आणि तिकडे लोकप्रतिनिधी नृत्यांगणला शहरात बोलावून आपला वाढदिवस साजरा करीत आहेत. ज्यांना आपण आपला लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेत नेतृत्व करण्यासाठी निवड केली,तोच व्यक्ति शेतकऱ्यां बद्दल एवढी उदासीन धोरण अवलंबीत असतील तर त्यापेक्षा मोठं दुर्दैव ते कोणतं,अशी गत शेतकऱ्यांची झाली आहे.

  • आमदार आणि गौतमी पाटील

गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार म्हणून होळी साहेब दोन वेळा नेतृत्व करीत आहेत पण साहेबांच्या निष्क्रिय पणामुळे क्षेत्रातील अडचणी सोडविण्यात आमदार साहेब आपला जनाधार गमावून बसले आहेत आणि जनाधार गमवलेले आमदार साहेब नृत्यांगणा गौतमी पाटीलचा आधार घेत आहेत पण गौतमिलाच नाही तर एशवऱ्या राय ला जरी शहरात गौतमी आणले तरी पण त्याचा काहीच उपयोग होणार नाही,हे मात्र सत्य आहे.

गौतमी पाटील


आमदार साहेब अजूनही वेळ गेलेली नाही,हे असले सोंग करण्यापेक्षा छातीला माती लावा अन क्षेत्रातील जनतेच्या अडी-अडचनीनां सोडविण्यासाठी पुढे या आणि जनतेची सहानभूती मिळवा,तेव्हा कुठं तुम्ही यशस्वी व्हाल अन्यथा नाही. चामोर्शी शहरात गौतमी पाटील यांना पाहण्यासाठी नवसे-गवसे तरुण मंडळी जमा होईल अन गौतमी पाटीलचा नाचगाणा पाहून आमदार साहेबांचा वाढदिवस आहे,हे सुद्धा विसरून जातील कारण त्यांना फक्त नाचगाणा पाहिजे आहे तुम्ही नाही. आज नाचगाणा पाहणारे तरुण मंडळी उद्या तुम्हाला मतदान सुद्धा करतील की नाही,याची शास्वती नाही,म्हणून आमदार साहेब हे सर्व सोडा आता अधिवेशन आहे,शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावा जनता तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल,अन्यथा अवघडयं गड्या,अशी परिस्थितीत झाल्या शिवाय राहणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या