Ad Code

Responsive Advertisement

पाटील बाई आल्या,आता जिल्ह्याच्या समस्या मार्गी लागतीलपाटील बाई आल्या,आता जिल्ह्याच्या समस्या मार्गी लागतील

गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी साहेब यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा,त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार होळी साहेबांनी राज्यातील लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील यांना चामोर्शी शहरात बोलावून तालुक्यातील जनतेवर एक प्रकारची मेहरबानीच केली. त्या निमित्ताने आमदार होळी साहेबांचे त्रिवार स्वागत आहे,कारण एकदिवसाचा का होईना पण जनतेचा मनोरंजन झाला आणि नाच-गाणा पाहून जनता देखील बेहड खुश होऊन गेली अन जिकडे-तिकडे आमदार साहेबांचा उदो-उदो झाला,निरंतर स्मरणात राहील असा वाढदिवस आमदार साहेबांनी साजरा केला,म्हणून आमदार साहेबांना मानाचा मुजरा.
गौतमी पाटील
  • आगळावेगळा वाढदिवस

गडचिरोली क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी साहेब यांचा आज जन्मदिवस आणि साहेबांनी आपला जन्म दिवस आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरविले अन वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यातील सुप्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील यांना चामोर्शी शहरात आमंत्रित करून चामोर्शी तालुका वाशिय जनतेला आमदार साहेबांनी अनोखी भेट प्रधान केली,असं म्हणायला हरकत नाही कारण नृत्यांगणा चामोर्शी नगरीत पहिल्यांदाच येत आहेत त्यामुळे चामोर्शी तालुक्यातील जनतेचा आनंद द्विगुणित झाला,असं म्हणायला काहीच हरकत नाही.

चामोर्शी तालुक्यातील भातपिकाची,कापूस पिकाची शेती असल्यामुळे जनता शेतीचे कामे करून थकली होती आणि थकलेल्या मनाला कुठतरी मनोरंजन पाहिजे होते आणि तो मनोरंजन आमदार साहेबांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने का होईना जनतेच्या मनात नवचैतन्य निर्माण केले,असंच म्हणावं लागेल कारण तालुक्यातील जनता गौतमी पाटिलच नावं एकली होती पण आता प्रत्यक्षात गौतमीला पहायला मिळलं म्हणजे जनतेचा आनंद गगनात मावेनासा झाला,न भूतो न भवीष्यती.

देवराव होळी

गौतमी पाटिलच्या प्रथम आगमनाने चामोर्शी तालुका वाशिय खुश झाले त्यामुळे आमदार होळी साहेबच मनभरून कौतुक करावे लागेल कारण एवढे मोठे महान कार्य आमदार साहेबांनी हाती घेऊन जनतेवर एक प्रकारची मेहरबानी केली,असं म्हणायला काहीच हरकत नाही,या कार्याबदल आमदार साहेबांचे प्रत्येक घराघरातून स्वागत व्हायला पाहिजे,अभिनंदनाचा वर्षाव व्हायला पाहिजे.

  • जिल्ह्यातील समस्या मार्गी लागतील,हिच जनतेची आशा

आमदार साहेबांच्या वाढदिवसा निमित्य गौतमी पाटील यांच्या आगमनाने चामोर्शी तालुक्यातील जनता बेहद खुश होऊन गेली. गडचिरोली जिल्ह्यात अनेक समस्या आवासून उभ्या आहेत,आता त्या पूर्ण करण्याची जबाबदारी गौतमी पाटीलवर आली आहे. जिल्ह्याच्या विकासाकरिता गौतमी यांना स्वता पुढाकार घेऊन गडचिरोली जिल्ह्याला भरभरून निधी उपलब्ध करून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास करावा एवढीच अपेक्षा गडचिरोली जिल्ह्यातील जनता गौतमी पाटील कडून कडून बाळगुण आहे कारण जो जिल्ह्याचा विकास आमदार होळी साहेब करू शकले नाही तोच विकास आता गौतमी पाटील कडून अपेक्षित आहेत आणि जिल्ह्यातील जनतेवर तशी वेळ आलेली आहे आणि गौतमी पाटील जिल्ह्याचा विकास करू शकतील,हिच अपेक्षा जनतेची आहे आणि जे कार्य जबाबदार लोकप्रतिनिधी करू शकले नाहीत ते कार्य गौतमी पाटील पूर्ण करू शकतील असं विश्वास तालुक्यातील जनतेला वाटायला लागलाय.
देवराव होळी

गडचिरोली जिल्हा उदयोगहीन जिल्हा आहे,याची पूर्ण कल्पना गौतमी पाटील यांना असल्यामुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी गौतमी पाटील भरभरून निधी सुद्धा उपलब्ध करून देतील आणि जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देतील अशी तमाम बेरोजगारांची अपेक्षा आहे आणि गौतमी पाटील त्या पूर्ण करतील अशी प्रचिती बेरोजगारांना आलेली असून जास्तीत-जास्त बेरोजगार कार्यक्रमाला उपस्थित राहतील,अशी अपेक्षा गौतमी पाटील सुद्धा बाळगुण आहे आणि ही गौतमी पाटील यांची अपेक्षा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. कुठल्याही आमदाराचे सर्वात महत्वपूर्ण कार्य म्हणजे आपल्या क्षेत्राचा विकास करणे होय,आणि आपल्या जिल्ह्याचे आमदार डॉ. होळी साहेब यांनी देखील आपल्या क्षेत्राच्या विकासासाठीच कार्य करत आहे,कदाचित क्षेत्राच्या विकासासाठीच त्यांनी गौतमी पाटीलला एवढा खर्च करून बोलावले असेल,त्यामुळे आता पाटील बाई जिल्ह्याचा विकास करू शकणार का नाही,हे बघावे लागेल.

आणखी वाचा :जनाधार गमावलेले आमदार घेऊ पाहतोय गौतमीचा आधार

  • युवक वर्ग आणि गौतमी

चामोर्शी शहरात गौतमी पाटील येणार म्हटल्यावर युवकांच्या आनंदाला पारावर उरला नाही,या कार्यक्रमाला जिल्ह्यातील संपूर्ण युवकांची उपस्थिती दर्शवतील. चामोर्शी शहरात या आधी असा कार्यक्रम कधी न झाल्यामुळे युवकांची गर्दी अपेक्षित होती अन ती पूर्ण झाली.न भूतो न भवीष्यती असा कार्यक्रम झाला,असं म्हणायला काहीच हरकत नाही. आमदार साहेबाला जि गर्दी अपेक्षित होती ती आमदार साहेबांची अपेक्षा पूर्ण झाली,असं म्हणायला काहीच हरकत नाही आणि या गर्दीमुळे आमदार साहेब जाम खुश होवून गेले अन त्यांच्या आनंदाला उधान आले आहे,तो आंनद द्विगुणित होवो,हिच अपेक्षा सगळीकडे व्यक्त होत आहे. आता तो आनंद टिकवून ठेवणे हे आमदार साहेबांच्या हातात आहे,बघू पुढची निवडणूक आमदार साहेबांना आनंद देते की दुख देते.

बहुजनांचा बुलंद आवाजटिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या