Ad Code

Responsive Advertisement

प्रभू आले मंदिरी

 


22 जानेवारी रोजी देशभरात दिवाळी साजरी होत असून.भक्तिमय वातावरण निर्माण होत आहे.प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा मोठ्या आनंदाने साजरी होत आहे.

||विजयी पताका श्रीरामाची अवतरली अंबरी,प्रभू आले मंदिरी||

उत्तर प्रदेशातील अयोध्या नगरीत सरयू नदीकाठी मर्यादा पुरुषोत्तमाचा भव्य दिव्य मंदिर उभारून श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा मोठ्या हर्ष उल्लासात आनंदी वातावरणात साजरी होत आहे.देशभरात भक्तिमय वातावरण निर्माण होत आहे म्हणजे आनंदाची गोष्ट आहे,असंच म्हणावं लागेल.

अयोध्या नगरीत श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणार असून देशातील तथा परदेशातील नामवंत नेते मंडळी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.या कार्यक्रमाला तब्बल 8000 पाहूने उपस्थित होणार आहेत.नेते-अभिनेते इत्यादी प्रकारचे नामवंत नेते मंडळी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार आहेत.

संपूर्ण भारत देशात 22 जानेवारी रोजी दिवाळी साजरी होताना दिसत आहे. उद्या होणाऱ्या कार्यक्रमाला जगभरातून शंभर विमाने पुरुषोत्तमाच्या अयोध्या नगरीत उतरणार आहेत.देशातील १७ राज्यातून ५० प्रकारचे वाद्ययंत्र वाजवीत दोन तास सतत वाजत राहणार आहे.
प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला १० वाजता पासून सुरुवात होणार असून,१२६५ किलो लाडू प्रसाद म्हणून वापरला जाणार आहे.जगातील सर्वात मोठा दिवा अयोध्या नगरीत ३०० फूट उंचीवर लावण्यात आला असून,1.25 किलो कापूस वापरून त्याची वात लावण्यात आलेली आहे आणि 21000 लिटर तेलाचा वापर करून भव्य दिव्य असा दिवा लावल्या जात आहे.

प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला १० वाजता पासून सुरुवात होणार असून,१२६५ किलो लाडू प्रसाद म्हणून वापरला जाणार आहे.जगातील सर्वात मोठा दिवा अयोध्या नगरीत ३०० फूट उंचीवर लावण्यात आला असून,1.25 किलो कापूस वापरून त्याची वात लावण्यात आलेली आहे आणि 21000 लिटर तेलाचा वापर करून भव्य दिव्य असा दिवा लावल्या जात आहे.

आणखी वाचा : राम नामाचा उदो-उदो


अठराशे करोड रुपये खर्च करून मर्यादा पुरुषोत्तमाचा भव्य दिव्य मंदिर उभारून राम लल्लाचे प्राणप्रतिष्ठा होत आहे.अयोध्या नगरीत साजरा होणाऱ्या कार्यक्रमाला राज्य सरकारने एक दिवसाची रजा मंजूर करून आनंद उत्सवात सहभागी झालेला आहे.अशा भक्तिमय वातावरणात साजरा होणाऱ्या कार्यक्रमाला देशवासीयांकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

वाटे अयोध्याला जावे अन डोळे भरून रामचंद्राला पहावे,असेच प्रत्येक भारतीयांना वाटायला लागले असून जात न असल्यामुळे आपल्या घरात आनंदी उत्सव साजरा करण्यात प्रत्येक भारतीय सज्ज झाला असून.अशा कार्यक्रमाला देशवासीयांकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या