जिव गेला तरी,जमीन देणार नाही !
कोनसरी परिसरातील भु.संपादन शेतकऱ्यांचा इशारा
महाराष्ट्र सरकारने कोनसरी परिसरातील कोनसरी,जैरामपूर,मुधोली चक नं.१,मुधोली चक नं.२,पारडीदेव,सोमनपल्ली या गावच्या हद्दीतील एकूण ८९८.८४२२ हेक्टर जमीन शासनाने खाजगी व सरकारी क्षेत्र असलेली भूमी अधिग्रहण करण्याचा आदेश काढलेला असून यामुळे परिसरातील शेतकरी डुबगाईस आल्या शिवाय राहणार नाही,अशी परिस्थितीत कोनसरी परिसरातील शेतकऱ्यांची झालेली आहे.
- भूमी अधिग्रहण जमीनिबाबत कोनसरी येथील जनतेचा ग्रामसभेत ठराव नामंजूर
महाराष्ट्र सरकारने कोनसरी परिसरातील जैरामपूर,मुधोली चक नं.१,मुधोली चक नं.२,पारडीदेव,सोमनपल्ली या परिसरातील शेतकऱ्यांची जमीन कंपनीने हडपण्याचा प्रकार असून याबाबत जनतेने ग्रामसभेत ठराव नामंजूर करण्यात आला,त्यामुळे प्रशासनात मोठी खळबळ माजली आहे.
गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ३० नोव्हेंबर २०२३ रोजी चामोर्शी औधोगीक क्षेत्राबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी यांनी कोनसरी परिसरातील गावांमध्ये चामोर्शी औधोगीक क्षेत्रासाठी जमीन अधिग्रहणा बाबत ना हरकत ठराव घेण्यासाठी ग्रामसभा आयोजित करण्यासाठी सूचना दिल्या होत्या. कोनसरी परिसरातील ग्रामपंच्यातीने ५ डिसेंबर २०२३ पर्यंत विशेष ग्रामसभा आयोजित करून ग्रामसभेत ना हरकत ठराव घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात सादर कराव्यात अशा सूचना दिलेल्या होत्या.
- राज्याचे अन्न व औषधी मंत्री ना.धर्मराव आत्राम यांनानिवेदन
महाराष्ट्र शासनाने कोनसरी परिसरातील जैरामपूर,मुधोली चक नं.१,मुधोली चक नं.२,पारडीदेव,सोमनपल्ली या गावच्या हद्दीतील एकूण ८९८.८४२२ हेक्टर जमीन शासनाने खाजगी व सरकारी क्षेत्र असलेली भूमी अधिग्रहण करण्याचा आदेश काढण्यात आलेला आहे त्यामुळे परिसरातील शेतकरी पूर्णपणे उदवस्थ होण्याचा प्रकार असल्यामुळे सदर आदेश रद्द करण्यात यावा,अशी मागणी सरपंच यांच्या वतीने राज्याचे अन्न व औषधी मंत्री ना. धर्मराव आत्राम यांना निवेदन देवून आपली व्यथा मंत्री महोदय यांच्या समोर बोलून दर्शवली.
कोनसरी परिसरातील ८९८.८४२२ हेक्टर जमीन कंपनीला हस्तांतरित करण्यात येणार असून शेतकऱ्यांना नेस्तनाबूत करण्याचा प्रकार आहे आणि यामुळे परिसरातील शेतकरी संकटात आल्याशिवाय राहणार नाही,हे सूर्यप्रकाशा इतके सत्य आहे तरी या प्रकाराची चौकशी करून भु. संपादन रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे.
- शेतकरी उदवस्थ व्हावा,हिच सरकारची नीती
महाराष्ट्र सरकारने चामोर्शी औधोगीक क्षेत्रातील कोनसरी परिसरातील ८९८.८४२२ हेक्टर जमिनीला भु. संपादित करण्याचा जो धाट घातला आहे यामुळे परिसरातील शेतकरी सर्वप्रथम नेस्तनाबूत होणार आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना संपविण्याचा डाव असून याला पूर्णपणे महाराष्ट्र सरकार कारणीभूत आहे.अशा प्रकल्पानमुळे औधोगीक क्रांति घडून येणार असल्याची खोटी बतावणी सरकार करीत असून या प्रकारामुळे शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबांना संपविण्याचा धाट घातला जात आहे आणि हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही.
आणखी वाचा : पालकमंत्री गेले कुणीकडे,जिल्ह्यातील जनता शोधात.....
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू,अशी पोकळ वल्गना एकीकडे सरकार करतो आहे आणि औधोगीक क्षेत्राला जमीन हस्तांतरित करून शेतकऱ्यांना संपविण्याचा धाट घातला जात आहे,म्हणजे विचार करा,सरकार शेतकऱ्यांना मूर्ख बनवीत असून,अशा सरकारी नितीला शेतकऱ्यांनी मिक न घालता एकीचे बळ म्हणजे एकता निर्माण करून सरकार विरोधात आवाज उठवायला पाहिजे,प्रसंगी रस्त्यावर उतरून लढाई लढण्याची तयारी ठेवायला पाहिजे,हे दणकट माझे बाहू या प्रमाणे सरकार विरोधात संघर्ष करायला पाहिजे.
जमीन हस्तांतरित करून त्या मोबदल्यात शेतकऱ्यांना पैसे मिळतील परंतु प्रश्न पैश्यांचा नाही. शेतकरी आधीच डबगाईला आलेला आहे आणि असल्या प्रकारांमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडून पूर्णपणे नेस्तनाबूत होईल. अशा प्रकारांमुळे शेतकऱ्यांची जात च जीवंत राहणार नाही. जिल्ह्यात औधोगीक क्रांति घडून येईल अशी खोटी बतापणी राजकीय पुढारी करीत असेल तरी यात शेतकरी भरडला जात आहे,हे राजकीय पुढाऱ्यांच्या लक्षातच येत नाही,असला प्रकार आहे. जिल्ह्यात औधोगीक क्रांति घडून येईल हे आपण ग्राहित धरू परंतु या औधोगीक क्रांतिमुळे किती बेरोजगारांना रोजगार मिळेल ? याची शाश्वती सरकारने द्यावी. पण सरकार याची शाश्वती देणार नाही कारण ही औधोगीक क्रांति ओट घटकेची ठरणार असून,यामुळे कोनसरी,जैरामपूर,मुधोली चक नं.१,मुधोली चक नं.२,पारडीदेव,सोमनपल्ली व इतर गावांतील शेतकरी मात्र पूर्णपणे संपून गेल्या शिवाय राहणार नाही.

0 टिप्पण्या