Ad Code

Responsive Advertisement

पराभवाची मरगळ दूर सारून,कॉंग्रेस भरू पाहते कार्यकर्त्यानं मध्ये जोशतेलंगणा मधील विजयासोबतच डिसेंबरची महिन्याची सुरुवात नागपूर लगतच्या मध्यप्रदेश व छत्तीसगड या राज्यामधील  पराभवाने झाली असली,तरी काँग्रेस पक्षासाठी महिन्याचा शेवट दोन आशादायक गोष्टींनी होता आहे.  पक्षाला ऊर्जितावस्थेच्या  स्थितीत आणणाऱ्या भारत जोडो यात्रेचा मणिपूर ते मुंबई,हा दुसरा टप्पा भारत न्या य यात्रा नावाने होणार असल्याची घोषणा बुधवारी झाली. दुसरी-शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे मित्रपक्ष फुटीमुळे घायल झाले असतानाही,महाराष्ट्रात महाविकास आघाडी अजूनही प्रबळ  असल्याचे एका सर्वेक्षणातून पुढे आले.या पार्श्वभूमीवर पक्षाचा 139 वा स्थापना दिवस साजरा करण्यासाठी नागपूरची निवड करण्यामागे काँग्रेसचा हेतू केवळ शक्तिप्रदर्शनाचा नसावा.त्यानिमित्ताने गुरुवारी होणारी काँग्रेसची सभा ही प्रत्यक्षात संदेशाची असेल.पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसेच श्रीमती सोनिया गांधी,राहुल व प्रियंका यांच्यासह देशभरातील नेते-कार्यकर्ते इंडिया आघाडीतील मित्रपक्ष सामील झाले.

कॉंग्रेस

भारत न्या य यात्रा हा भारत जोडो चा दुसरा टप्पा आहे.विकार द्वेषाएवजी  ऐवजी परस्पर स्वभाव प्रेम ही भारत जोडो ची संकल्पना तर मणिपूर हिंसाचाराच्या पृष्ठभूमीवर अन्यायग्रस्तांना न्यायासाठी प्रत्यक्ष लोकांमध्ये जाणे,हा विचार नव्या यात्रेत दिसतो.लोकसभेची सेमी फायनल मानलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर इंडिया आघाडीतील सगळ्यात पक्षांची राजकीय भाषा तसेच देहबोली बदललेली आहे.काँग्रेससाठी दिवस करो वा मरो,चे आहेतच.

इंडिया आघाडी

सलग दोन लोकसभा निवडणुकांमधील शक्तीपातामधून काँग्रेस पक्ष अजून सावरलेला नाही.दक्षिणेकडे थोडी सुस्थिती असली तरी अडचण उत्तर भारतातील हिंदी पट्ट्याची आहे.तिथे नेत्यांचे वाद व कार्यकर्त्यांच्या मरगळ दूर करण्याचा इलाज अजून सापडलेला नाही.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तीन राज्यात कॉंग्रेस पक्षाचा  पराभव झाला,तेव्हा पश्चिम बंगाल,बिहार,महाराष्ट्र अशा काही मोठ्या राज्यांवर इंडिया आघाडीचा दबदबा असेल,अशी आशा कॉंग्रेस पक्षाची असेल,त्यातही महाराष्ट्र हा काँग्रेससाठी आशेचा किरण आहे.विदर्भ बहुतेक वेळा काँग्रेसच्या पाठीशी उभा राहिला आहे गेल्या विधानसभेलाही विदर्भाने बरेच यश दिले.तथापि काँग्रेस अथवा इंडिया आघाडीची हिमालय एवढी समस्या आहे.ती लोकसभा निवडणुकीत चेहऱ्याचे आधीच चेहरा ठरविण्याची गरज नाही असे 1977 चा दाखला देत शरद पवार यांच्यासारखे ज्येष्ठ सांगत असले तरी,मतदारांना तशी गरज वाटते का ? 

आणखी वाचा इंडिया आघाडीचे वाजायला लागले तीन तेरा

सध्याच्या देशातील स्थितीचा आढावा केला तर कॉंग्रेस पक्ष किंवा इंडिया आघाडीची स्थिति नाजुक आहे.२०२४ मध्ये  लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष विजयाची हॅट्रिक लावेल,असे अंदाज अनेक राजनेतीक सल्लाकार वर्तवत आहेत,तर आता इंडिया आघाडीची सामोरची वाटचाल कशी असेल,यावर संपूर्ण देशाचे लक्ष आहे. राहुल गांधीची भारत न्याय यात्रा,लोकांच्या मनात उतरते का नाही,हे तर लोकसभेच्या निवडणुकीनंतरच माहीत पडेल. टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या