Ad Code

Responsive Advertisement

कोणसरी परिसरातील भूसंपादन शेतकऱ्यांनो शासनाचे प्रयत्न हाणून पाडा,रमेश चौखूंडे ची विनंती



कोनसरी,जैरामपूर,मुधोली चक नं.१,मुधोली चक नं.२,पारडीदेव,सोमनपल्ली या परिसरात महाराष्ट्र सरकारने एमआयडीसी स्थापन करून शेतकऱ्यांच्या जमिनी कारखानदाराच्या माथी मारण्याचा जो शासनाचा प्रयत्न आहे. त्याला विरोध म्हणून कोनसरी परिसरातील सर्व माझे शेतकरी बांधव एकत्रपणे निर्णय घेऊन,महाराष्ट्र सरकारचे प्रयत्न एकजुटीने हाणून पाडावे,अशी कळकळीची विनंती मी माझ्या शेतकरी बांधवांना करतो आहे. कारण महाराष्ट्र शासनाच्या अशा प्रयत्नांमुळे या परिसरातील शेतकरी सर्वप्रथम नष्ट होणार आहे म्हणजे शेतकरी नावाची जात शिल्लक राहणार नाही आणि महाराष्ट्र सरकारला सुद्धा तसंच वाटत आहे. शेतकरी संपला तरी चालेल पण कारखानदार जगला पाहिजे हीच नीती महाराष्ट्र सरकारने अंगीकारली आहे आणि हीच नीती सरकार राबवीत आहे.

शेतकरी



आपली जमीन टिकवून ठेवणे यातच शेतकऱ्यांचे हित आहे त्यामुळे या परिसरातील शेतकरी एकजूट होऊन शासनाविरोधी लढा देणे अत्यंत आवश्यक असल्यामुळे, आपली एकी घडवून आणून शासनाविरोधी लढा द्यायला आपण सर्वजण सज्जा आहोत.हे सर्वप्रथम शासनाच्या निदर्शनास आणून देणे महत्त्वाचे आहे.शासनाच्या खोट्या भूलथापांना बळी न पडता शासनाचे मनसुबे हाणून पाडणे काळाची गरज आहे त्यामुळे भूसंपादन परिसरातील शेतकरी एकत्र होऊन शासनाविरोधात लढा दिल्याशिवाय महाराष्ट्र सरकार वाटेवर येणार नाही. म्हणून जल,जंगल ,जमीन बचाव याच नीतीचा वापर करून शासनाविरोधात लढा उभा करणे अत्यंत आवश्यक असून महाराष्ट्र सरकारचे मनसुबे हाणून पाडावे एवढेच कळकळीची विनंती करतो.

शेतकरी



महाराष्ट्र सरकारने चामोर्शी औधोगीक क्षेत्रातील कोनसरी परिसरातील ८९८.८४२२ हेक्टर जमिनीला भु. संपादित करण्याचा जो धाट घातला आहे यामुळे परिसरातील शेतकरी सर्वप्रथम नेस्तनाबूत होणार आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना संपविण्याचा डाव असून याला पूर्णपणे महाराष्ट्र सरकार कारणीभूत आहे.अशा प्रकल्पानमुळे औधोगीक क्रांति घडून येणार असल्याची खोटी बतावणी सरकार करीत असून या प्रकारामुळे शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबांना संपविण्याचा धाट घातला जात आहे आणि हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही.

आणखी वाचा : जिव गेला तरी,जमीन देणार नाही ! कोनसरी परिसरातील भु.संपादन शेतकऱ्यांचा इशारा

जमीन हस्तांतरित करून त्या मोबदल्यात शेतकऱ्यांना पैसे मिळतील परंतु प्रश्न पैश्यांचा नाही. शेतकरी आधीच डबगाईला आलेला आहे आणि असल्या प्रकारांमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडून पूर्णपणे नेस्तनाबूत होईल. अशा प्रकारांमुळे शेतकऱ्यांची जात च जीवंत राहणार नाही. जिल्ह्यात औधोगीक क्रांति घडून येईल अशी खोटी बतापणी राजकीय पुढारी करीत असेल तरी यात शेतकरी भरडला जात आहे,हे राजकीय पुढाऱ्यांच्या लक्षातच येत नाही,असला प्रकार आहे. जिल्ह्यात औधोगीक क्रांति घडून येईल हे आपण ग्राहित धरू परंतु या औधोगीक क्रांतिमुळे किती बेरोजगारांना रोजगार मिळेल ? याची शाश्वती सरकारने द्यावी. पण सरकार याची शाश्वती देणार नाही कारण ही औधोगीक क्रांति ओट घटकेची ठरणार असून,यामुळे कोनसरी,जैरामपूर,मुधोली चक नं.१,मुधोली चक नं.२,पारडीदेव,सोमनपल्ली व इतर गावांतील शेतकरी मात्र पूर्णपणे संपून गेल्या शिवाय राहणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या