Ad Code

Responsive Advertisement

युवकांचा कल उलट्या प्रवाहाने वाहतोय

 आजचा युवक उद्या देशासाठी आधारस्तंभ होऊ शकतो,हे जरी सत्य असलं तरी पण युवकांची आजची मानसिकता पाहिलं तर तो स्वतःसाठी जरी आधारस्तंभ बनून जीवन जगला तरी पुरेसा आहे,असं म्हणायला हरकत नाही.कारण आजचा युवक व्यसनाच्या जोखडात भरकटलेला असून त्याचा कल उलट्याप्रवाहाने वाहतोय मग तो व्यसन कोणताही असो पण शेवटी व्यसनाच आहे.


युवकांची अर्धी अधिक ताकद क्रिकेटने नष्ट केली आणि आजचा युवक इतका क्रिकेट प्रेमी होऊन गेला की क्रिकेट सुरू असेल तर त्याची लक्ष नाही जेवणाकडे राहत आणि नाही कामाकडे म्हणजे विचार करा किती क्रिकेटचा आधीन गेला असेल त्याची कल्पना न केलेली बरी आजचा तरुणाचा उधोगती कडे जाण्याचा हा पहिला व्यसन.

युवक


आजच्या युवकाचा दुसरा व्यसन तर तो सगळ्यांना परिचितच आहे या व्यसनामुळे स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव हरवून बसलाय इतका भयंकर व्यसन आणि तो म्हणजे दारू आज कित्येक तरी युवकांनाअल्पवयातच हा व्यसन लागून गेला आणि त्यातून तो स्वतःला सावरण्याच्या प्रयत्न करतो तरी पण त्या प्रवाहात वाहतच गेला आणि त्यातून बाहेर निघणे सुद्धा दुरापारत होऊन गेलाय.


शौक इतका करावा की त्यापासून शोक करण्याची वेळ आली नाही पाहिजे पण हे आजच्या युगाला कळण्या पलीकडे होऊन गेलाय अशी अवस्था आहे आज पण समाजात पाहतोय दारूकडे युवकांच्या कल पूर्वेपेक्षा आज जास्त आहे मग तो संगतीच्या परिणाम म्हणायचं हे स्वतःच्या बुद्धीने म्हणावा हेच कळत नाही आपण ज्याचा विचार देखील करू शकत नाही तो युवक दारूच्या आहारी गेलेला आहे हे जेव्हा माहित होते तेव्हा कपाळावर हात ठेवल्याशिवाय दुसरा पर्यायच राहत नाही.

युवक

दारूमुळे कित्येकांचे घर उध्वस्त झाले आहेत दारूमुळे कित्येकांच्या बायका माहेरी जाऊन बसला आहे. दारूमुळे कितीकांचे मुलं बाळ सुद्धा रस्त्यांवर आलेले आहेत हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहतोय परंतु पाहूल मात्र दारूच्या दिशेने वाळताना दिसतो.आपण दारूच्या इतक्या आहारी गेलेलो आहोत की त्यातून बाहेर निघूच शकत नाही इतकी भयानक वास्तव्य आहे.अल्पवयात लागलेले दारूच्या व्यसन सुटू शकत नाही कारण आपण दारूच्या अगदी जवळ पोहोचले आहोत दारू आपल्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असेल परंतु आपण तिला दूर जाऊ देत नाही.आपण दारू पीत नाही तर दारू आपल्याला पीत आहे आणि हे सत्य आहे.


आणि आजच्या युवकांचा तिसरा वेसन तो म्हणजे आळस.आळस माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे पण आजच्या युवक त्याच्याकडे गांभीर्याने बघण्याचा प्रयत्न करत नाही जोपर्यंत युवक आळसाला दूर सारणार नाही तोपर्यंत यशाच्या किनारा गाठू शकणार नाही यशाच्या किनारा गाटायचे असेल तर प्रबळ इच्छाशक्ती साध्य करावी लागेल आणि प्रबळ इच्छा शक्तीच्या भरोशावर आकाशाला गवसनी घालावी लागेल. इच्छाशक्तीच्या जोरावर स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथील परिषदेवर आपला वर्चस्व सिद्ध केले.खिशात पैसे नसताना देखील आजचा युवक इतका चतुर आणि हुशार आहे की क्षणात जग बदलू शकते पण त्यासाठी जिद्द चिकाटी आणि प्रबळ इच्छाशक्ती सर्वप्रथम आत्मसात करावी लागेल परंतु त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला अंगी असलेल्या दुर्गुणांचा त्याग करावा लागेल पण आजच्या युवकाला तेच साध्य करता येत नाही कारण व्यसनाचे जोखडात स्वतःला इतका वाहून घेतलेल्या की त्यातून तो बाहेर पडू शकत नाही.

आजही वेळ गेलेली नाही मनावर घेतला तर सर्वकाही साध्य करता येते आणि करायलाच पाहिजे जसा जसा जग बदलत चाललाय तसा तसा युवकांनी स्वतः बदलायला पाहिजे कारण उद्याची उज्वल भविष्याची पहाट तुझ्या दाराशी येऊन तुझी वाट पाहतोय युवक उठ आणि माझे स्वागत कर.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या