अयोध्या येथील राम मंदिराचा उद्घाटन सोहळ्याच्या रितीरिवाजाप्रमाणे काँग्रेस अध्यक्ष,माजी अध्यक्ष आणि सांसद यांना निमंत्रण दिले होते,परंतु तो निमंत्रण फेटाळत काँग्रेस पक्षाने,एक प्रकारे हिंदुत्वाला नकारले. असे म्हणायला काहीच हरकत नाही,हे यावरून स्पष्ट होत आहे.
मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांचे आयोध्या नगरीत भव्य-दिव्य मंदिर उभारून एक प्रकारे हिंदुत्वाच्या भावना मनात जागृत करण्याचा प्रकार सरकार करीत आहे आणि श्रीराम प्रभू म्हणजे देशातील तमाम हिंदू समाजाची आस्था असणारे प्रभू आहेत. मंदिराचे बांधकाम पूर्णत्वास येत असून,श्रीराम प्रभूची प्राणप्रतिष्ठा असा कार्यक्रम उभा होतो आहे.
22 जनवरी 2024 रोजी अयोध्या येथे मर्यादा पुरुषोत्तमाचे प्राणप्रतिष्ठा होणार असून,त्या कार्यक्रमाला देशातील नामवंत व्यक्तींना निमंत्रण करण्यात आले आहे.श्रीराम प्रभूच्या प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. मल्लिकार्जुन खरगे,माजी अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी आणि सांसद अधीर रंजन चौधरी या नेत्यांना सुद्धा देण्यात आले,परंतु अयोध्या येथील श्री रामाची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम,हा भाजपाचा कार्यक्रम आहे.म्हणून अयोध्या येथील होणाऱ्या कार्यक्रमाला जाणार नाही,अशी भूमिका कॉंग्रेस पक्षाने घेतलेली आहे.म्हणजे इंडिया आघाडीत सामील असणारे सर्वच्या सर्व पक्षातील नेते मंडळी,ह्यांनी सुद्धा श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेला जाण्यास विरोध दर्शविला आहे.
वास्तविक श्रीराम प्रभूच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला इंडिया आघाडीमढील नेत्यांनी सहभागी व्हायला पाहिजे होतं. कारण ह्या कार्यक्रमाला देशातील संपूर्ण हिंदू धर्माची आस्था जोडलेली असून,हिंदू समाज श्रीरामाला दैवत मानतात. परंतु कार्यक्रमाचे निमंत्रण धुडकावत इंडिया आघाडीने देशातील तमाम हिंदूंना अपमानित केलं,असं म्हणायला काहीही हरकत नाही.राजकीय पक्षातील आरोप-प्रत्यारोप हे होतच असतात,राजकीय वैरत्व हा देशातील जनतेला माहीतच आहे.परंतु तो राजकीय पक्षाचा वैयक्तिक विचार आहे परंतु अयोध्या येथील श्रीराम प्रभूच्या प्राणप्रतिष्ठा या कार्यक्रमाला सर्वच्या सर्व राजकीय पक्षातील नेते उपस्थित राहून हिंदू समाजाच्या भावना जपण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होते.
आणखी वाचा : पराभवाची मरगळ दूर सारून,कॉंग्रेस भरू पाहते कार्यकर्त्यानं मध्ये जोश
उघड-उघड विरोध करून कार्यक्रमावर बहिष्कार टाकले हा विकृतीचा प्रकार आहे,असं म्हणायला काही हरकत नाही.हा अयोध्या येथील होणारा कार्यक्रम हा भाजपाचा कार्यक्रम आहे,म्हणून इंडिया आघाडीतील नेते जाणार नाही. म्हणजे ते या कार्यक्रमाला खुलेआम विरोध करीत आहे.याच कार्यक्रमाला भाजपा मोठा उत्सव म्हणून साजरा करीत आहे,म्हणजे हिंदुत्वाला खरा आधार भाजपाच देत आहे.म्हणजे आघाडी मधील सर्व नेते हिंदू विरोधी आहेत. हिंदुत्वाचा कैवारी भाजपच आहे,असं म्हणायला कुण्या भविष्यात याची गरज पडणार नाही.देशातील तमाम हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत आणि हिंदुत्वाचे कैवारी म्हणून हिंदू समाजाने भाजपाशी अधिक जुडवून घ्यायला पाहिजे कारण समोरही हिंदुत्वाचे रक्षण करणारा पक्ष म्हणजे भाजपाचा आहे.हे देशातील बाकीचे सर्व हिंदू विरोधी पक्ष आहेत,या प्रकारवरून असं समजने काहीच वावगं ठरणार नाही.
0 टिप्पण्या