Ad Code

Responsive Advertisement

ऊर्जामंत्री देवेंद्र फडणविसांच्या अलगर्जी पणामुळे कृषिपंप धारक शेतकऱ्यांवर ओढावला संकट

ऊर्जामंत्री देवेंद्र फडणविसांच्या अलगर्जी पणामुळे कृषिपंप धारक शेतकऱ्यांवर ओढावला संकट

गडचिरोली जिल्ह्यातील काही मोजकेच फिडर असे आहेत की,त्या फिडर मध्ये मोडणाऱ्या शेतकऱ्यांना भारनियमनाचा फटका बसत आहे. बाकी सर्व जिल्ह्यात आलबेल परिस्थिति आहे आणि भारनियमनाचा फटका ज्या शेतकऱ्यांना बसला ते शेतकरी मात्र डबगाईस आले हिच परिस्थिति कृषि पंपधारकांवर आली आहे.

शेतकरी

 
  • भेंडाळा सबस्टेशनवर कृषिपंपधारकांचा मोर्चा

चामो तालुक्यातील भेंडाळा सबस्टेशन अंतर्गत येणारे घारगांव आणि कळमगांव या दोन फिडरचे मिळून एकूण १६ गांव आहेत आणि १६ गावानांच भारनियमनाचा सर्वात जास्त फटका कृषिपंपधारक शेतकऱ्यांना बसला असून या भागातिल शेतकरी हतबल झाला होता म्हणूनच चमोर तालुक्यातील भेंडाळा सबस्टेशन अंतर्गत येणारे कृषिपंपधारकांनी सबस्टेशनवर आक्रोश मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करून महाराष्ट्र शासना विरुद्ध आपला रोष प्रगट केला होता,जो पर्यंत मागणी मान्य होणार नाही तो पर्यंत आंदोलन मागे घेणार नाही,या मागणीवर कृषिपंपधारक ठाम होते.

शेतकरी


तालुक्याचे तहसीलदार यांना निवेदन दिले आणि त्यानंतर गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन देण्यात आले परंतु कृषिपंपधारकांचा काहीच फायदा झाला नाही. आठ तासांचे जे काही वीज देत होते,ती जैसे थे आहे आणि हे लक्षात आल्यावर मग कुठं नाईलाजाने कृषिपंपधारकांना आक्रोश मोर्चा काढून महाराष्ट्र सरकार विरोधात तीव्र नाराजी प्रकट करून आपला आक्रोश व्यक्त करण्यात आला.

  • शेतकरी शिष्टमंडळ आणि ऊर्जामंत्री फडणवीस

गडचिरोली जिल्ह्यातील मोजक्याच ठिकाणी भारनियमन सुरू असून ते बंद करण्यात यावे या मागणीचे निवेदन राज्याचे ऊर्जामंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांना त्यांच्या नागपूर येथील राहत्या घरी आणि खास विजयादशमीच्या दिवशी कृषिपंपधारक शिष्टमंडळाने प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली आणि स्वता फडणविसांनी २४ तासांची मागणी मान्य करीत १२ तास वीज कृषिपंप धारकांना देण्याची तयारी दर्शवली होती.

आणखी वाचा : जन आंदोलन शिवाय पर्याय नाही,कृषिपंप धारकांना रमेश चौखूंडेचे आव्हान

परंतु ऊर्जामंत्री फडणवीस दिलेला शब्द पाळू शकले नाहीत म्हणजे कृषिपंप धारकांना जि आठ तास वीज मिळत होती,तिच मिळत राहिली आणि भारनियमणा मुळे कृषिपंप धारकांना मोठा फटका बसला आणि पीक हातातून गेला,एवढी नामूस्की कृषिपंप धारक शेतकऱ्यांवर आली.

देवेंद्र फडणवीस

 
  • १२ तास वीज मिळाली असती,तर पीके गेली नसती
विजयादशमीच्या दिवशी कृषिपंप धारक शेतकऱ्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून आठ तास मिळणारी वीज २४ तास मिळावी,ही मागणी घेऊन गेलेल्या शेतकऱ्यांना स्वता ऊर्जामंत्री २४ तास नाही परंतु १२ तास वीज कृषिपंप धारकांना देण्याचे आश्वासन दिले होते परंतु ऊर्जामंत्र्यांचे आश्वासन हवेतच विरले परंतु त्या वेळी जर कृषिपंप धारकांना १२ तास वीज मिळाली असती तर शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावल्या सारखा झाला,त्यावर आला बसला असता. म्हणजे सरळ-सरळ सांगायचे झाल्यास विजयादशमीच्या दिवसांत १२ तास वीज मिळाली असती तर कृषिपंप शेतकऱ्यांची पिके नष्ट झाली नसती आणि जि काही कृषिपंप धारकांची हाणी झाली त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वेळकाढू पणाच्या भूमिकेमुळे झाली असं खेदाने म्हणावं लागेल.

आणखी वाचा : पुन्हा आंदोलन उभे करू कृषि पंपधारकांचा सरकारला इशारा
  • १२ तास वीज आता दिवसांसाठी
शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास राज्याचे ऊर्जामंत्री यांच्या वेळकाढू भूमिकेमुळे झाले कारण त्यावेळी भात पीक गर्भावस्थेत असल्यामुळे भरपूर पाणी पाहिजे होता आणि नेमका त्याचवेळी आठ तासाच्या विजेमुळे पुरेसा पाणी पिकांना देवू न शकल्यामुळे हाताशी आलेला भात पीक मरण यातना भोगता-भोगता मरून गेला,अशी अवस्था कृषिपंप धारक शेतकऱ्यांची झाली.

देवेंद्र फडणवीस


आता राज्याचे ऊर्जामंत्री फडणविसांनी आता दोन दिवसांपूर्वी कृषिपंप धारकांना ८ तासांवरून १२ तासांची वीज उपलब्ध करून दिली परंतु ती १२ तास मिळणारी वीज किती दिवसांसाठी आहे,असा प्रश्न कृषिपंप धारक शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. आता मिळणारी १२ तासांची वीज कायम स्वरूपी मिळणार आहे की,ते औत घटकेचीच आहे,असा प्रश्न कृषिपंप धारक शेतकरी दबक्या आवाजात एकमेकांना विचारीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या